Thursday, May 18, 2006

आमटी

साहित्य

१/२ कप तुरीची डाळ

फोडणीसाठी : २ चमचे तेल, १/२ चमचा मोहरी, चिमुटभर हिन्ग, १/२ चमचा हळद

५-६ मिरच्या, कढिलिम्ब
चवीनुसार मीठ, गूळ
छोटा चमचा गोडा मसाला/काळा मसाला
Tamarind concentrate/आमसूल
वरुन घालायला ओल खोबर, कोथिम्बिर

कृती

तुरीची डाळ साधारण डाळीच्या दुप्पट पाणी घालून शिजवून घ्यावी व डावानी घोटून एकजीव करावी.

एका पातेल्यात तेल गरम करुन त्यात मोहरी, हिन्ग, हळद घालून फोडणी करावी. फोडणीत मिरच्यान्चे तुकडे, कढिलिम्ब घालावा.

त्यात वरण घालून आपल्या आवडीनुसार, गरजेनुसार पाणी घालून आमटी कमी-जास्त घट्ट करावी.


नन्तर त्यात गूळ, चिन्च, मसाला आणि मीठ घालून थोडावेळ (~५ मि.) उकळावी.


स्वयपाक करायला लागल्यावर मला ज्या अनेक गोष्टी कळल्या त्यात आमटी उकळण ही एक महत्वाच आहे ही एक. आमटी किती वेळ उकळली आहे आणि ओल खोबर घातल असल्यास खोबर घातल्यानन्तर किती उकळली आहे त्यावर तिची चव अवलम्बून आहे.


Subtypes

फोडणीत मोहरीबरोबर ४-५ मेथीचे दाणे घातल्यास वेगळी चव येते. यात मिरची ऎवजी लाल तिखट घालावे आणि चिन्च, गूळ, ओल खोबर आवश्यक. कढिलिम्ब घालू नये

फोडणीत कान्दा घातल्यास सुद्धा लाल तिखट, कढिलिम्ब घालावा.

शेवग्याच्या शेन्गा आधी उकडून फोडणीत घालाव्यात. लाल तिखट, चिन्च, गूळ.

सुरुवात

आईच्या हातची साधी आमटी पण कशी मस्त असते. घरी रोज जेवताना ती कसा स्वयपाक करते ते बघाव असा विचार मनाला कधी शिवला नाही. आता रोज स्वयपाक करताना कितीही variations केली तरी तशी चव येत नाही. तर अशाच प्रयोगातून झालेले हे पदार्थ.